तुरूंगात लालू करणार माळीचे काम, मिळणार 93 रुपये रोजंदारी !

वृत्तसंस्था
रविवार, 7 जानेवारी 2018

लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, त्यांना दोन प्रकरणात प्रत्येकी 5 लाख असा एकूण 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर आता त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. लालूप्रसाद यादव हे तुरुंगात माळीकाम करणार असून, यासाठी त्यांना 93 रुपयांची रोजंदारी दिली जाणार आहे.

सुमारे 950 कोटींचा पशूखाद्य गैरव्यवहार केल्याप्रकरणी न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह इतर जणांना 23 डिसेंबरला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना 3 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र, त्यांची शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर काल (शनिवार) रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, त्यांना दोन प्रकरणात प्रत्येकी 5 लाख असा एकूण 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत असून, ते माळी काम करणार आहेत. या कामासाठी त्यांना 93 रुपये रोजंदारी दिली जाणार आहे. 

Web Title: marathi news national news fodder scam case lalu yadav to shift hazaribagh open jail will work as gardener