मी इतरांप्रमाणे भारत सोडून जाणारा नाही : कार्ती चिदंबरम

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

''मी भारतात परतताना सीबीआयने मला विमानतळावरून अटक केली. पण मी इतरांप्रमाणे भारत सोडून पळून जाणारा नाही''.

- कार्ती चिदंबरम

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आज (बुधवार) सकाळी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर कार्ती चिंदबरम यांना आज सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. ''मी इतरांसारखा भारत सोडून जाणार नाही'' असे कार्ती चिदंबरम यांनी त्यांचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांच्यामार्फत न्यायालयात सांगितले.

CBI

अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले, की ''कार्ती यांना अटक करण्यापूर्वी त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळही दिला गेला नाही किंवा त्यांना अटकेपूर्वी मागील 6 महिन्यांत कोणतेही समन्सही दिले गेले नाही. त्यांना ऑगस्ट 2017 मध्ये समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर एकही समन्स बजावण्यात आले नाही'', असे सिंघवी म्हणाले.

''मी भारतात परतताना सीबीआयने मला विमानतळावरून अटक केली. पण मी इतरांप्रमाणे भारत सोडून पळून जाणारा नाही'', असेही सिंघवी यांनी कार्ती यांच्या वतीने सांगितले. 
 

Web Title: Marathi News National News I am not a Hindustan Leaver like others says Karti Chidambaram