'रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म' भारताची वाटचाल : पंतप्रधान

PM MODI
PM MODI

नवी दिल्ली : भारताची वाटचाल 'रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म' (बदलासाठी सुधारणेच्या दृष्टीने) वाटचाल सुरु आहे. आमच्या सरकारने जीएसटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने देशात आकारले जाणारे विविध करांचे 
जाळे नष्ट करण्यात आले असून, देशाचे एकीकरण करण्यात आले आहे. सध्या कोणत्याही क्षेत्रात बदल केला नाही, असे एकही क्षेत्र नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज येथे केले. तसेच भारत 'ट्रान्सफॉर्म' होत असून, भारताबाबत जगाचा दृष्टीकोन सकारात्मक होत आहे, असेही ते म्हणाले.  

'प्रवासी संसद संमेलना'त पंतप्रधान बोलत होते. या संमेलनात 23 देशांचे 140 हून अधिक खासदार उपस्थित होते. यामध्ये ब्रिटेन, कॅनडा, फिजी, केनिया, मॉरिशियस, न्यूझीलंड आणि श्रीलंकेतील खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, या संमेलनाचा उद्देश प्रवासी भारतीयांचा संबंध मजबूत व्हावा, असा आहे. भारताने अनेक देशांना मदत केली. नेपाळ, श्रीलंकेमध्ये आलेल्या पूरात भारताने मदत केली. यमनमध्ये संकट आले, तेव्हा 4500 नागरिकांना आम्ही वाचवले. 48 देशांतील जवळपास 2 हजार लोकांना वाचवण्यात आले. भारत 'सबका साथ सबका विकास' यावर काम करत आहे.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून स्किल योजना, स्टँडअप योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप योजना सुरु करण्यात आल्या आहेत. देशातील युवकांना 4 लाख कोटींचे कर्जे देण्यात आली आहेत.

9 जानेवारी रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून परत आले होते. त्यामुळे आता हा दिवस 'प्रवासी दिवस' म्हणून साजरा केला जात आहे. या संमेलनात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, अमेरिकेत सध्या सिनेट सभा सुरु असल्याने अमेरिकेचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहू शकला नाही. तसेच प्रवासी संसद समेलनच्या माध्यमातून भारताचे नाव जगभरात झाले आहे.

भारताने जगाभरात नेहमी सकारात्मक भूमिका बजावली आहे. आमची दुसऱ्या देशाच्या सीमेवर नजर नाही. आशियाई देशातील संबंध मजबूत होत आहेत. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीच्या आशियाई पाहुणे असतील. 

या संसद संमेलनाचे एक सत्र राज्यसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, दुसरे सत्र लोकसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  

दरम्यान, भारताबाबत जागतिक बँक, आयएफएम आणि मूडीजचाही दृष्टीकोन सकारात्मक बनत आहे.  व्यापार करण्यासाठी आम्ही नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. 'ग्लोबल इनोव्हेशन इन्डेक्स'मध्ये 21 अंकाची सुधारणा केली, असेही मोदी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com