जेव्हा इंडिगो विमान करते, 14 प्रवाशांना सोडून उड्डाण...

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

''इंडिगो विमान नियोजित वेळेच्या आधी रवाना झाले. विमानतळावर या विमानाच्या टेक ऑफबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही''

- संबंधित प्रवासी

नवी दिल्ली : विमानाच्या सेवेबाबत अनेकदा सर्वसामान्यांच्या मनात विशेष अशी भावना असते. बऱ्याचदा विमान हे अपेक्षित वेळेत उड्डाण करत असते. मात्र, इंडिगोने नियोजित वेळेच्या आधीच टेक ऑफ केल्याने त्या विमानाने प्रवास करण्यासाठी आलेल्या 14 प्रवाशांना न घेताच विमानाने उड्डाण केले. त्यामुळे या प्रवाशांना इच्छित स्थळी पोचता आले नाही.

इंडिगोचे 6E 259 हे विमान सोमवारी रात्री 10.50 वाजता रवाना होणार होते. मात्र, या विमानाने 25 मिनिटे आधी टेक ऑफ केले होते. गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाने जाण्यासाठी तिकिट काढलेल्या 14 प्रवाशांना विमानाने नियोजित वेळेपूर्वी उड्डाण केल्याने या विमानातून प्रवास करता आला नाही. याबाबत एका प्रवाशाने सांगितले, की ''इंडिगो विमान नियोजित वेळेच्या आधी रवाना झाले. विमानतळावर या विमानाच्या टेक ऑफबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही''.

मात्र, या सर्व प्रवाशांनी केलेला दावा इंडिगो प्रवक्त्यांनी खोडून काढला. ''प्रवाशांना गेटवर रिपोर्ट करण्यासाठी अनेक वेळा उड्डाणाबाबत घोषणा करण्यात आली होती. हे सर्व प्रवासी वेळेत आले नाहीत''.   

दरम्यान, आमची कोणतीही चूक नसताना त्या चौदा प्रवाशांची व्यवस्था दुसऱ्या दिवशी सकाळच्या विमानात केली आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही पैसेही आकारले नसल्याचे स्पष्टीकरण इंडिगोकडून देण्यात आले. 

Web Title: Marathi news National News Indigo Goa Hyderabad flight departs early leaves 14 passengers behind