...म्हणून मला खुल्या कारागृहात नको : लालूप्रसाद यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

लालूप्रसाद यादव यांनी आपल्याला खुल्या कारागृहात ठेऊ नये. कारागृहात असताना मला भेटायला अनेक लोक येऊ शकतात. त्यामुळे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे.

रांची : कोट्यवधी रुपयांचा पशूखाद्य गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी आपल्याला खुल्या कारागृहात ठेऊ नये. कारागृहात असताना मला भेटायला अनेक लोक येऊ शकतात. त्यामुळे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष न्यायाधीश शिवपाल सिंग यांनी लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी 23 डिसेंबर रोजी दोषी ठरवले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राज्य सरकारने पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणातील सर्व दोषींना खुल्या कारागृहात ठेवण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. 

खुल्या कारागृहात आपल्याला भेटायला अनेकजण येऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. या गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मला खुल्या कारागृहात ठेऊ नये, असे लालूंनी न्यायालयाला सांगितले.  

दरम्यान, लालूंच्या या मागणीला न्यायालय काय निर्णय देते, हेच पाहणे गरजेचे आहे.

Web Title: marathi news national news Lalu Prasad warns sending him to open jail will create problem