'ती' तुलना जवानांसोबत नाही तर सामान्य जनतेसोबत : आरएसएस

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

''भागवतांनी लष्करातील जवानांच्या कार्यक्षमतेवर कोणतेही भाष्य केलेले नाही किंवा स्वयंसेवकांची तुलना भारतीय लष्करातील जवानांसोबत केली नाही ही तुलना सामान्य जनतेशी केली''.

 

आरएसएसचे प्रवक्ते मनमोहन वैद्य

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवतांनी भारतीय लष्करातील जवानांची तुलना संघातील स्वयंसेवकांशी केल्यानंतर आता आरएसएसकडून याबाबत सारवासारव केली जात आहे. ''सरसंघचालक भागवतांनी लष्करातील जवानांची तुलना संघाच्या स्वंयसेवकांशी केली नाही तर सामान्य जनतेशी केली''. 

RSS

 

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर आरएसएसचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली. ते म्हणाले, ''भागवतांनी लष्करातील जवानांच्या कार्यक्षमतेवर कोणतेही भाष्य केलेले नाही किंवा स्वयंसेवकांची तुलना भारतीय लष्करातील जवानांसोबत केली नाही ही तुलना सामान्य जनतेशी केली. स्वयंसेवकांप्रमाणेच सामान्य जनतेने लष्कराच्या बरोबरीने येण्याची वेळ येत आहे, असेही वैद्य म्हणाले. 

manmohan vaidya rss
 
काय म्हणाले होते मोहन भागवत ?

"आरएसएसचे स्वयंसेवक देशासाठी लढण्यासाठी तीन दिवसांत तयारी करून लढू शकतात. तर दुसरीकडे लष्कराला लढण्यासाठी 6 ते 7 महिने तयारीसाठी लागतील'', असे ते म्हणाले होते.

Web Title: Marathi News National news Mohan Bhagwat RSS Compare Mohan vaidya