मीसा भारतींविरोधात दुसरे आरोपपत्र दाखल

misa bharati
misa bharati

नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्या खासदार मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 'पीएमएलए' कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयात 5 फेब्रुवारीला यावर विचार केला जाणार आहे. 

सक्तवसुली संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात यापूर्वीही आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबत विशेष न्यायाधीश एन. के. मल्होत्रा यांनी 'ईडी'वर नाराजी व्यक्त करत आपण तक्रार दाखल करणार का, तुम्ही आता यासाठी किती पुरवणी पत्र दाखल करणार आहात. आपली एक प्रमुख तपास संस्था आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात 23 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आज मीसा भारतींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com