'यूपी', बिहार पोटनिवडणूक ; गोरखपूरमध्ये 'सप' आघाडीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची तर केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. योगी आदित्यनाथ गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधित्व करत होते. तर मौर्य फुलपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते. या दोघांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान घेण्यात आले होते.

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (बुधवार) सकाळपासून सुरु करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधील गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला टक्कर देत समाजवादी पक्षाने तब्बल 1500 मतांनी आघाडी घेतली आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची तर केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. योगी आदित्यनाथ गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा प्रतिनिधित्व करत होते. तर मौर्य फुलपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते. या दोघांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान घेण्यात आले होते.

या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु असून, सध्या भाजपला मागे टाकत समाजवादी पक्षाने 1500 मतांची आघाडी घेतली आहे. 

तसेच बिहारमधील अरारिया लोकसभा तर भादुआ आणि जहानबाद विधानसभा जागांसाठी 11 मार्चला मतदान घेण्यात आले होते. या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरु आहे. भबुवा येथे भाजप आघाडीवर असून, भाजपने 2714 मतांची आघाडी घेतली.

Web Title: Marathi News National News Political News UP Bihar Bypoll SP Ahead in Gorkhpur