आम्ही शांततापूर्ण परिवर्तन करणार : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

''भाजप शांततेच्या मुद्यावर गंभीर नाही. आम्ही समाजातील ध्रुवीकरण आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यांना मोठ्या संकटासारखे पाहत आहोत. एक असे परिवर्तन आहे, जे सर्वांना एकत्र ठेवत आहे".

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सिंगापूर आणि मलेशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी मूळचे भारतीय असलेले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''आम्ही भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहोत. आमच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. आम्ही शांततापूर्ण परिवर्तन करणार आहोत''.

सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी मूळचे भारतीय असलेले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी रोजगार, आर्थिक विषयांबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ''आम्ही भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहोत. आमच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, आम्ही शांततापूर्ण परिवर्तन करणार आहोत. महिलांचे अधिकार आणि सशक्तीकरणाच्या मुद्यांवर कमला क्लब काम करत आहे''. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''भाजप शांततेच्या मुद्यावर गंभीर नाही. आम्ही समाजातील ध्रुवीकरण आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यांना मोठ्या संकटासारखे पाहत आहोत. एक असे परिवर्तन आहे, जे सर्वांना एकत्र ठेवत आहे". 

 

Web Title: Marathi News National News Political News Congress President Rahul Gandhi