आम्ही आमच्या पित्याच्या मारेकऱ्यांना माफ केले : राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

''मी आणि माझी बहिण प्रियंका गांधी-वडेरा यांनी आमच्या पित्याच्या मारेकऱ्यांना माफ केले. या घटनेनंतर काही वर्षांपूर्वी आम्ही अत्यंत निराश होतो. मात्र, अशाप्रकारे वेळेनुसार मी आणि माझ्या बहिणीने आमच्या पित्याच्या मारेकऱ्यांना माफ केले''.

- राहुल गांधी, अध्यक्ष, राहुल गांधी

नवी दिल्ली : ''मी आणि माझी बहिण प्रियंका गांधी-वडेरा यांनी आमच्या पित्याच्या मारेकऱ्यांना माफ केले. या घटनेनंतर काही वर्षांपूर्वी आम्ही अत्यंत निराश होतो. मात्र, अशाप्रकारे वेळेनुसार मी आणि माझ्या बहिणीने आमच्या पित्याच्या मारेकऱ्यांना माफ केले'', असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी सध्या सिंगापूर-मलेशिया दौऱ्यावर आहेत. सिंगापुरमध्ये त्यांनी 'आयआयएम'च्या माजी विद्यार्थ्यांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. येथे राहुल गांधी यांना माजी पंतप्रधान आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान आणि त्यांचे पिता राजीव गांधी यांच्या हत्येबाबत विचारण्यात आले. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, ''आम्हाला माहिती आहे, की आम्हाला याची किंमत चुकवावी लागू शकते. कारण जेव्हा आपण कोणतीही भूमिका घेतो तर नकारात्मक शक्ती आपल्या विरोधात उभ्या राहतात. त्यावेळी तुमच्या जीवालाही धोका पोहचू शकतो''. 

ते पुढे म्हणाले, ''आम्हाला माहिती होते, की आमचे पिता आणि आमची आजी यांच्यासोबत काही अनपेक्षित घटना घडणार होती. तसेच मला माझी आजी इंदिरा गांधी यांनी मी मरायला जात आहे, असे सांगितले होते. याबाबतचा व्हिडिओ ट्विटर हँडवरून शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, ''या हत्येमागील कारण कोणतेही असो. मात्र, आम्ही आमच्या पित्याच्या मारेकरांना माफ केले आहे. मला कोणत्याही प्रकारची हिंसाचार पसंद नाही''. तसेच त्यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ''भाजप देशातील महत्वपूर्ण प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही न करता सर्वांना एकत्र आणू शकत नाही''.  

Web Title: Marathi News National News Political News Rahul Gandhi Forgives Rajiv Gandhi Attackers