अमित शहांच्या 'आश्वासना'नंतर पटेलांनी स्वीकारला पदभार

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

"भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी मला फोन केला. त्यामुळे आज मी मंत्रिपद स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राज्यपाल ओ. पी. कोहली यांची दुपारी भेट घेणार असून, मला मंत्रिपद देण्याबाबत पत्र देणार आहेत''. 

अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीन पटेल यांना 'आश्वासन' दिल्यानंतर पटेलांनी गुजरातचे मंत्रिपद अखेर स्वीकारले. नितीन पटेलांना वजनदार खाते हवे असल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अखेर अमित शहांच्या आश्वासनानंतर पटेलांनी पदभार स्वीकारला.

गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपला 99 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमताच्या जोरावर भाजपने गुजरातमध्ये सत्ता स्थापन केली असून, मुख्यमंत्रिपदी विजय रुपाणी यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. मात्र, पटेलांना आवडीचे खाते दिले नसल्याने नाराज झालेल्या पटेल यांनी कोणतेही पद स्वीकारले नव्हते. मात्र, अमित शहा यांनी त्यांना क्रमांक 2 चे मंत्रिपद देऊ केले असून, त्यांना मोठे अधिकार असलेले खाते देण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे.  

याबाबत पटेल म्हणाले, "भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी मला फोन केला. त्यामुळे आज मी मंत्रिपद स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राज्यपाल ओ. पी. कोहली यांची दुपारी भेट घेणार असून, मला मंत्रिपद देण्याबाबत पत्र देणार आहेत''. 

दरम्यान, मागील सरकारच्या कार्यकाळात पटेलांना अर्थ आणि शहरी विकास मंत्रालय देण्यात आले होते. त्यानंतर यंदा त्यांना बांधकाम, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण देण्यात आल्याने ते नाराज होते. 

Web Title: marathi news national news politics news Upset Nitin Patel Takes Charge After Assurance From Amit Shah