रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील : अक्षय कुमार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

''रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील''

- अक्षय कुमार ​

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांना राजकीय नेत्यांसह बॉलिवूडच्या दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. अभिनेता अक्षय कुमारने त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ''रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील'', असे अक्षय कुमार म्हणाला. 

रजनीकांत यांनी 31 डिसेंबरला राजकीय प्रवेशाची घोषणा केली. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांना बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. बिग बी अमिताभ बच्चन, कबीर बेदी, रितेश देशमुख, खुशबू सुंदर यांसारख्या बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज अक्षय कुमारने त्यांना शुभेच्छा दिल्या. रजनीकांत राजकारणातील उत्तम आणि उत्तम राजकारणी ठरतील, असे अक्षय कुमारने सांगितले.

Web Title: marathi news national news politics rajinikanth will be very good as a politician says actor akshay kumar