जयपूर ते दिल्ली प्रवास करा, अवघ्या 90 मिनिटांत !

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

जयपूर ते दिल्ली हे 271 किमी अंतर अवघ्या 90 मिनिटांत पार केले जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नवी सेमी-हाय स्पीड रेल्वे तयार केली जाणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेसारखा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनेकांना आवडतो. प्रवाशांच्या गरजेनुसार रेल्वेकडूनही विशेष अशा सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसाच एक प्रयत्न भारतीय रेल्वेकडून केला जात आहे. त्यानुसार जयपूर ते दिल्ली हे 271 किमी अंतर अवघ्या 90 मिनिटांत पार केले जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नवी सेमी-हाय स्पीड रेल्वे तयार केली जाणार आहे.

rail

जयपूर ते दिल्ली या 271 किमीच्या प्रवासासाठी सध्या साडेपाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सेमी-हाय स्पीड रेल्वे तयार करण्याचा विचार सध्या रेल्वे मंत्रालयाकडून केला जात आहे. नव्या रेल्वेचा वेग 200 किमी/प्रतितास असणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून हे 271 किमीचे अंतर अवघ्या 90 मिनिटांत पार केले जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार, इटलीस्थित रेल्वे इंजिनिअरिंग कंपनी 'एफएस-इटालफेर' या दृष्टीने अभ्यास करत असून, हा प्रकल्प अस्तित्वात आणण्याबाबत विचार केला जात आहे.   

''या सेमी-हाय स्पीड रेल्वेबाबत विचार असून, दोन स्थानकांदरम्यानचे ऑपरेशन पॅटर्न, या मार्गावरील प्रवाशांची संख्या, या मार्गावरील मालवाहतुकीची संख्या, ट्रॅकची संख्या, रेल्वे ट्रॅकची बांधणी पुलासह, प्लॅटफॉर्म्स, सिग्नलस् याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच जयपूर आणि दिल्लीदरम्यान रेल्वे क्रॉसिंगचीही माहिती आम्हाला विचारण्यात आली. सध्या आम्ही मागवण्यात आलेली माहिती देण्याचे काम करत आहोत. येत्या 10 दिवसांत त्यांना ही माहिती पाठविली जाईल'', असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News National News Rail Journey jaipur to delhi will reach 90 minutes