लष्कराविरोधातील तक्रारप्रकरणी स्वामींचा सीतारमन यांच्यावर निशाणा

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

काही दिवसांपूर्वी शोपियान जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संघर्षात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भारतीय लष्करातील काही जवानांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरातील शोपियान येथे भारतीय लष्करातील जवानांवर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरप्रकरणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर निशाणा साधला. स्वामींनी ट्विटरवरून निशाणा साधला.

indian army

काही दिवसांपूर्वी शोपियान जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संघर्षात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भारतीय लष्करातील काही जवानांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय लष्करानेही जमावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना लष्कराने दाखल केलेल्या तक्रारीचे समर्थन केले. त्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी सीतारमन यांच्यावर निशाणा साधला. 

दरम्यान, आताच्या परिस्थितीत काश्मीरातून 'अफ्स्पा' कायदा हटवण्यासारखी परिस्थिती नाही, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले होते. 
 

Web Title: Marathi News National News Subramanyam Swami BJP MP