5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

आतापर्यंत 51 लाख घरे बांधण्यात आली असून, येत्या वर्षातही 51 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 36 लाख घरे शहरात बांधली जाणार आहेत.

नवी दिल्ली : देशातील नागरिकांसाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत. 'प्रधानमंत्री उज्ज्वला' योजनेंतर्गत आत्तापर्यंत 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तसेच मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. 

2018-19 वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सादर केले जात आहे. त्यादरम्यान जेटली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, देशातील नागरिकांना वीज कनेक्शन देण्यासाठी 1600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे.

आतापर्यंत 51 लाख घरे बांधण्यात आली असून, येत्या वर्षातही 51 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 36 लाख घरे शहरात बांधली जाणार आहेत.
 

Web Title: Marathi News National News Union Budget 2018 Gas Connection Education Finance Minister Arun Jaitley