महिलांच्या सहमतीशिवाय त्यांना स्पर्श करु नका : दिल्ली न्यायालय

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांनी उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या चवी राम या आरोपीस 2014 रोजी एका बालिकेला अयोग्यरितीने स्पर्श केल्याच्या कारणातून त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

नवी दिल्ली : कोणतीही व्यक्ती महिलांच्या परवानगीशिवाय त्यांना स्पर्श करू शकत नाही, असे मत दिल्ली न्यायालयाने नोंदवले. स्त्रिया लैंगिकरित्या विकृत असलेल्या पुरुषांना बळी पडतात, हे एकप्रकारचे दुर्दैव आहे, असेही न्यायालयाचे म्हणणे आहे. 

एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने छवी राम यास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यादरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांनी उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या चवी राम या आरोपीस 2014 रोजी एका बालिकेला अयोग्यरितीने स्पर्श केल्याच्या कारणातून त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही घटना उत्तर दिल्लीतील मुखर्जीनगर येथील भाजी मार्केट येथे घडली. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तेव्हा हा प्रकार घडला. 

याबाबत न्यायालयाने सांगितले, की 'महिलांचे शरीर हे त्यांचे स्वत:चे आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्यांचा पूर्ण हक्क आहे. तसेच त्यांच्या सहमतीशिवाय कोणत्याही कारणास्तव इतर कोणालाही स्पर्श करता येऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, राम हा लैंगिकरित्या विकृत असा मनुष्य आहे. त्याला याप्रकरणी 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी 5 हजार रूपये पीडित बालिकेला देण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

Web Title: Marathi news National No one can touch a woman without her consent says Delhi court