केरळात झळकले किम जोंग यांच्या फोटोंचे बॅनर्स

kim-jong-un
kim-jong-un

तिरूअनंतपुरम : केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनर्सवर उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची छायाचित्रे झळकली आहेत. केरळात अशाप्रकारे त्यांचे फोटो झळकल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील परिषदेच्या प्रचारासाठी किम जोंग उन यांचे छायाचित्रे असलेले बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, ही परिषद संपूनही हे बॅनर्स काढण्यात आले नाहीत. त्यामुळे याविषयीची चर्चा सगळीकडे सुरु आहे. जगभरात दहशत निर्माण करण्यासाठी किम जोंग उन निरनिरळ्या अणुचाचण्या घेत आहेत. त्यांना रोखण्यासाठी अमेरिका वारंवार प्रयत्न करत आहे. असे असताना किम जोंगने अणुचाचण्या घेणे अद्याप बंद केलेले नाही.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकही झाली होती. अमेरिकेने जोंग यांना अणुचाचण्या थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांची अणुचाचणी अद्यापही सुरुच आहे. त्यानंतर आता केरळमध्ये किम जोंग यांचे छायाचित्र बॅनर्सवर लावल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 

''किम जोंग उन हे अमेरिकेला आव्हान देणारे एकमेव साम्यवादी नेते असल्याची भावना आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही'', असे इडुक्की येथील सीपीएमचे सचिव के. के. जयचंद्रन यांनी स्पष्ट केले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com