रेल्वे तिकीट आरक्षित केल्यास मिळणार सवलती

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सध्या विमान प्रवास करण्यापूर्वी आरक्षण करून तिकीट काढल्यास विमान कंपन्यांकडून भरघोस सवलत दिली जाते. याच धर्तीवर रेल्वेकडून रेल्वे तिकीटावर सवलत देण्याचा विचार सुरु आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि गरोदर महिलांना रेल्वे तिकीट विनामूल्य दिले जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून रेल्वे तिकीटावर सवलती देण्याबाबत विचार केला जात आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आरक्षित रेल्वे तिकीटावर 50 टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. 

सध्या विमान प्रवास करण्यापूर्वी आरक्षण करून तिकीट काढल्यास विमान कंपन्यांकडून भरघोस सवलत दिली जाते. याच धर्तीवर रेल्वेकडून रेल्वे तिकीटावर सवलत देण्याचा विचार सुरु आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि गरोदर महिलांना रेल्वे तिकीट विनामूल्य दिले जाण्याची शक्यता आहे.

या समितीच्या झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाचे अधिकारी, नीती आयोगाचे सल्लागार रवींद्र गोयल, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक (महसूल व्यवस्थापन) मीनाक्षी मलिक, प्रा. एस. श्रीराम आणि महसूल संचालक इती मानी उपस्थित होते.

रेल्वे समितीने सांगितले, की ''रेल्वेने प्रवास करण्याच्या काही दिवस अगोदर तिकीट आरक्षित केल्यास उपलब्ध जागानुसार 50 टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच सोयीस्कर वेळेत निघणाऱ्या रेल्वे तिकीटाचा दर वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Marathi news National Plan early to get discounts on train travel Railway panel