काश्‍मीरचा युवावर्ग योगदान देऊ शकतात : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील प्रतिभावान युवावर्ग देशासाठी मोठे योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. पंतप्रधानांनी आज येथे जम्मू-काश्‍मीरच्या शालेय विद्यार्थीनींशी संवाद साधला. लष्कराच्या सद्‌भावना कार्यक्रमाअंतर्गत या विद्यार्थिनी देशाचा दौरा करीत आहेत. 

पंतप्रधानांनी यावेळी शिक्षणापासून ते स्वच्छ भारत अभियान आणि योगाचे फायदे यावर विद्यार्थीनींशी संवाद साधला. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्‌वीट करून ही माहिती दिली. देशाच्या विविध भागाचा दौरा करणाऱ्या या विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आपले सरकार मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या उपाययोजना करीत आहे हे जाणून घेण्यामध्ये त्यांना रस होता, असे ते म्हणाले. जम्मू काश्‍मीरचे प्रतिभाशाली युवक देशासाठी खूप मोठे योगदान देऊ शकतात. राज्यातील युवक नागरी सेवेत सहभागी होताना आणि क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना पाहताना खूप आनंद होतो, असे ट्‌वीट पंतप्रधानांनी केले आहे. 

Web Title: marathi news national PM Narendra Modi Kashmir