...म्हणून 29 वेळा दिल्लीत गेलो : चंद्राबाबू नायडू

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

''आंध्रप्रदेशच्या विकासासाठी मी दिल्लीत 29 वेळा गेलो. यासाठी पंतप्रधानांना विनंती केली. तसेच पोलावरम प्रकल्पासाठी निधी द्यावा, अशी विनंतीही केली होती. मात्र, हे सर्व व्यर्थ झाले''. 

-  चंद्राबाबू नायडू , सर्वेसर्वा, तेलुगू देसम पक्ष

अमरावती : आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आक्रमक भूमिका घेणारे 'तेलुगू देसम पक्षा'चे (टीडीपी) सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''राज्याच्या विकासासाठी 29 वेळा पंतप्रधानांची भेट घेतली. पण हे सर्व व्यर्थ झाले''.

चंद्राबाबू नायडूंनी आंध्रप्रदेशला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी त्यांनी वेळोवेळी केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चंद्राबाबू नायडू म्हणाले, की ''आंध्रप्रदेशच्या विकासासाठी मी दिल्लीत 29 वेळा गेलो. यासाठी पंतप्रधानांना विनंती केली. तसेच पोलावरम प्रकल्पासाठी निधी द्यावा, अशी विनंतीही केली होती. मात्र, हे सर्व व्यर्थ झाले''.  

दरम्यान, 'टीडीपी' एनडीएतून बाहेर पडल्याने केंद्रात मंत्री असलेले अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

Web Title: Marathi News National Political News TDP exit from NDA 29 Times went to delhi says Chandrababu Naidu