बाबासाहेबांनी तयार केलेले संविधान धोक्यात: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

सध्या देशात काय घडत आहे. भाजप मूळ विचारांवर चालत आहे. पण आम्ही हे असे कधीही करणार नाही. आम्ही मात्र सत्य कधीही सोडणार नाही. भाजप राजकारणासाठी खोटे बोलत आहे आणि त्यामुळेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान धोक्यात आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, ''देशाचे संविधान धोक्यात असून, त्यापासून बचाव करणे हे काँग्रेस आणि देशातील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. भाजप राजकारणासाठी खोटे बोलत आहे.''

काँग्रेस पक्षाच्या 133 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे काँग्रेस मुख्यालयात गेले असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''सध्या देशात काय घडत आहे. भाजप मूळ विचारांवर चालत आहे. पण आम्ही हे असे कधीही करणार नाही. आम्ही मात्र सत्य कधीही सोडणार नाही. भाजप राजकारणासाठी खोटे बोलत आहे आणि त्यामुळेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान धोक्यात आहे'', असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर चढवला.

काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी करण्यात आली होती. आज पक्षाचा 133 वा वर्धापनदिन असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. 

Web Title: marathi news national politics Constitution of the country is under threat says Congress president Rahul Gandhi