लालूंच्या दुसऱ्या जावयाला 'ईडी'कडून समन्स 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

काही दिवसांपूर्वी मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात ईडीकडून दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचे दुसऱ्या जावयाविरोधात समन्स बजावण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दुसऱ्या जावई राहुल यादव यांना सक्तवसुली संचलनायलयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समन्स बजावले आहे. 

राहुल यादव यांनी त्यांच्या सासू आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या खात्यात काही रक्कम हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. याबाबत 'ईडी'च्या सूत्रांनी सांगितले, की ''लालूंची चौथी कन्या रागिनी यांचे पती राहुल यादव यांना सक्तवसुली संचलनालयाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 कोटींची रक्कम कोणत्या कारणासाठी दिली गेली, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले.  

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मे. मिशैल पॅकर्स आणि प्रिंटर्स प्रा. लि. मीसा आणि शैलेश यांच्याशी संबंधित असल्याच्या संशयातून हे समन्स बजावण्यात आले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात ईडीकडून दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या जावयाविरोधात समन्स बजावण्यात आले आहे. 

Web Title: Marathi news National Politics ED summons Lalu Prasads second son in law Rahul in money laundering case