मोदींच्या पत्नीला काँग्रेसने दिली होती 'ऑफर'

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांना काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ऑफर दिली असल्याची माहिती मिळत आहे. गुजरात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस-भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने ही ऑफर दिली. मात्र, त्यांनी ती नाकारल्याचा दावा जशोदाबेन यांच्या एका नातेवाईकाने केला आहे.

भाजपकडून गुजरात विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारसभा घेण्यात आल्या. या दोन्ही नेत्यांनी प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका केली. राज्यात सत्ता कायम राखण्यासाठी केंद्रीय पातळीवरचे नेतेमंडळी भाजपकडून प्रचारासाठी उतरवण्यात आले. त्यानंतर काँग्रेसकडूनही ही निवडणूक जिंकायचे ठरवले. त्यादृष्टीने प्रचारसभा घेण्यात आल्या. इतकेच काय तर काँग्रेसकडून थेट मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनाच पक्षाकडून उमेदवारी देण्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, जशोदाबेन यांनी त्यास स्पष्ट नकार दिला.  

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप 130 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास जशोदाबेन यांनी व्यक्त केला.

Web Title: marathi news national politics gujrat election congress offer to pm modi wife jashodaben for contest election for congress