'आप'च्या 20 आमदारांचे सदस्यत्व अखेर रद्द

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

'आप'च्या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपती कोविंद यांना शिफारस केली होती. निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर राष्ट्रपती कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रपतींच्या या मंजूरीनंतर दिल्लीमध्ये 20 जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने 'आप'ला मोठा धक्का बसला.

'आप'च्या 20 आमदारांनी लाभाचे पद घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रपती कोविंद यांना शिफारस केली होती. निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर राष्ट्रपती कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रपतींच्या या मंजूरीनंतर दिल्लीमध्ये 20 जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला 'आप'ने आव्हान देत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
Web Title: Marathi News National Politics kejriwal pushing presidents approval recommendation cancel membership