रजनीकांत यांच्यावर सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

''माझ्या प्रिय मित्रा, माझा सहकारी आणि विनम्रशील व्यक्ती रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा केल्याने माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्यासोबत असतील''.

(अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते  )

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांना बॉलिवूडच्या दिग्गज मंडळींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. ''माझ्या प्रिय मित्रा, माझा सहकारी आणि विनम्रशील व्यक्ती रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा केल्याने माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्यासोबत असतील''.

''2017 च्या अखेरच्या दिवशी राजकीय प्रवेशाची घोषणा करून रजनीकांत यांनी मोठी बातमी दिली. 'जय हो', असे अभिनेते अनुपम खेर म्हणाले.

''अभिनंदन माझ्या बंधू रजनीकांत, राजकीय प्रवेशाबाबत अभिनंदन'', असे अभिनेता कमल हसन यांनी ट्विटवर सांगितले.

''रजनीकांत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आशा करतो, तमिळनाडू राज्यात राजकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील'', असे अभिनेते कबीर बेदी यांनी सांगितले. 

''रजनीकांत यांनी आपल्या कलेला मन आणि आत्म्याच्या रुपात दिले आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. मला विश्वास आहे, त्यांना पुढील राजकीय वाटचालीमध्ये खूप मोठे प्रेम मिळेल. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा'', असे रितेश देशमुख म्हणाले.

''रजनीकांत यांनी राजकारणात उडी घेतली आहे. रजनीकांत यांना लोकशाही आणि विकासावर विश्वास आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो'', असे काँग्रेस प्रवक्ते आणि अभिनेते खुशबू सुंदर यांनी ट्विट करून सांगितले. 

 

Web Title: marathi news national politics rajnikant political entry congratulations