गुजरातच्या काही भागात उद्या होणार फेरमतदान 

EVM
EVM

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर इव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला. त्यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या तक्रारीनंतर राज्यातील सहा मतदान केंद्रांवर उद्या (रविवार) फेरमतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.  

गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडली. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान गुरुवारी पूर्ण झाले. मात्र, इव्हीएममध्ये तांत्रिकदृष्ट्या फेरफार झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या. या तक्रारींवरून निवडणूक आयोगाने इव्हीएमची चौकशी केली. या चौकशीनंतर राज्यातील सहा मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील विरामगाम, दसक्रोई आणि बासकंथा जिल्ह्यातील वडगाम या केंद्रासह इतर तीन केंद्राचा समावेश असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com