...म्हणून जातीय राजकारण थांबणे गरजेचे : भागवत

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

''सध्या जातीय राजकारणामुळे जातीच्या नावावरून उमेदवाराला मतं दिली जातात. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी जातीय राजकारण थांबणे गरजेचे आहे''

मुंबई : ''सध्या जातीय राजकारणामुळे जातीच्या नावावरून उमेदवाराला मतं दिली जातात. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी जातीय राजकारण थांबणे गरजेचे आहे'', असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

सध्या देशात जातीय राजकारण करून निवडणुका लढवल्या जात आहेत. यावर भागवत म्हणाले, ''जीवनात व्यापर असो किंवा राजकारण सामाजिकरित्या दाखवण्यात आलेला नैतिक व्यवहार राजकारणात दिसायला हवा. त्यामध्ये बदल आणणे आवश्यक आहे. राजकारणात स्वत:हून बदल घडवला जाऊ शकत नाही. मात्र, राजकारणाच्या मार्गात जात असताना त्याप्रमाणे चालायचे असल्याचे त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे''.

ते पुढे म्हणाले, ''जातीय राजकारण संपवण्यासाठी आजपासून प्रयत्न केले पाहिजेत. सध्या निवडणुकांमध्ये जातीय राजकारण करत मते मागितली जातात. उमेदवाराच्या नावावरून जातीय राजकारण केले जाते. राजकारणात जर कोणाला टिकून राहायचे असल्यास तसे करणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन करायचे असल्यास नावावरून केले जाणारे राजकारण बंद होणे गरजेचे आहे". 

 

Web Title: Marathi news National Politics Social transformation needed to end caste politics says RSS Mohan Bhagwat