विजय रुपानींकडे पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्रिपद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

गुजरात विधानसभा निवडणूक विजय रुपानी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपला 99 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक आज पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपचे सरचिटणीस सरजो पांडे यांच्या देखरेखीखाली नव्या मुख्यमंत्र्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत रुपानी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. 

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची पुन्हा निवड करण्यात आली. गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी विजय रुपानी यांची निवड केल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. तर नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्री नियुक्ती करण्यात आली. 

गुजरात विधानसभा निवडणूक विजय रुपानी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपला 99 जागांवर समाधान मानावे लागले. तसेच नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक आज पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपचे सरचिटणीस सरजो पांडे यांच्या देखरेखीखाली नव्या मुख्यमंत्र्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत रुपानी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. 

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा आत्ताच्या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य कमी झाले आहे. तरीदेखील सलग सहाव्यांदा भाजपला गुजरातमध्ये सत्ता मिळाली आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, याबाबतचे वृत्त त्यांनी फेटाळून लावल्याने या चर्चा थांबल्या होत्या. त्यानंतर जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची घोषणा केली.

Web Title: marathi news national politics Vijay Rupani to continue as Gujarat chief minister and Nitin Patel to be his deputy