...तर भीक मागणे हादेखील रोजगार : पी. चिदंबरम

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

''भजी तयार करून विकणे हा एक रोजगार असला तर भीक मागणे, हेदेखील एकप्रकारे रोजगाराचे साधन आहे''.

- पी. चिदंबरम, काँग्रेस नेते

नवी दिल्ली : ''भजी तयार करून विकणे हा एक रोजगार असला तर भीक मागणे, हेदेखील एकप्रकारे रोजगाराचे साधन आहे'', असे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भजी तयार करुन ती विकणे ही एक नोकरी आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चिदंबरम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, भजी तयार करून विकणे हा एक रोजगार असला तर भीक मागणे, हेदेखील एकप्रकारे रोजगाराचे साधन आहे. पुढे ते म्हणाले, सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यावर मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्याबाबत मोदी सरकारला काहीही सूचत नाही.  

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, जर भजी विकून 200 रुपये मिळत असतील, तर त्यांना रोजगार म्हणून पाहावे का असे ते म्हणाले होते.

 

Web Title: Marathi News National selling pakoda is employment so begging is also a job says p chidambaram