शिवसेनेचे कार्यकर्ते फडकवणार श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा

Flag
Flag

जम्मू : काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हान केले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते तिरंगा फडकवण्यासाठी लाल चौक येथे रवाना झाले आहेत.

फारूख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ''ते पाकव्याप्त काश्मीरामध्ये तिरंगा फडकवण्याची भाषा करतात. मी त्यांना विचारतो, त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवावा'', असे अप्रत्यक्षपणे आव्हानच अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला केले होते.

त्यांच्या आव्हानानंतर ''शिवसेनेचे एक विशेष पथक श्रीनगर येथे पाठवण्यात आले आहे. ते उद्या लाल चौकात तिरंगा फडकवणार आहे'', अशी माहिती जम्मू-काश्मीरचे शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष डिंपी कोहली यांनी दिली. तसेच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते श्रीनगरसाठी रवाना झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com