तक्रार दाखल होण्यापूर्वीच नीरव मोदी देशातून पळाला 

पीटीआय
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा व्यावसायिक नीरव मोदीने याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल होण्यापूर्वीच देशातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेची तक्रार 'सीबीआय'कडे 29 जानेवारी रोजी वर्ग झाली. पण नीरव मोदी एक जानेवारी रोजीच देशातून बाहेर गेला होता. 

विशेष म्हणजे, नीरवचा भाऊ निशल मोदी हादेखील त्याच्याच बरोबर एक जानेवारी रोजी देश सोडून गेला. निशल हा बेल्जियमचा नागरिक आहे. नीरवची अमेरिकी पत्नी ऍमी आणि व्यावसायिक भागीदार मेहूल चोक्‍सी यांनी 6 जानेवारी रोजी पलायन केले. नीरव हा भारतीय नागरिक आहे या चौघांच्या विरोधात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर 'सीबीआय'ने 31 जानेवारी रोजी 'लूक आऊट नोटीस' बजावली. 

नीरव मोदी सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. किंबहुना, 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये असताना 23 जानेवारी रोजी काढलेल्या एका समूह छायाचित्रात नीरव मोदीही आहे. पंजाब नॅशनल बँकेने अधिकृत तक्रार दाखल करण्यापूर्वी सहा दिवस आधी ही घटना घडली होती. 

2011 पासून या गैरव्यवहाराची सुरवात झाली. तेव्हा सत्तेत आम्ही नव्हतो. आज आमच्यावर आरोप करणारी कॉंग्रेस 2011 ते 2014 या कालावधीत झोपली होती का? आमचे सरकार सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांच्या तक्रारींची दखल घेत आहे आणि त्यावर कारवाईही करत आहे. 
- एस. पी. शुक्‍ला, अर्थ राज्यमंत्री 

पीएनबी: खातेदारांनी निश्चिंत रहा आणि आम्हाला थोडा वेळ द्या!

Web Title: marathi news nirav modi CBI Punjab Natioanl Bank