स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

हैद्राबाद विमानतळावर एका स्वीडिश नागरिकांने प्रचंड दंगा घातलाय. या माणसाने नुसतीच बाचाबाची केली नाही तर स्वतःला यानं आधी विमानाच्या वॉशरुममध्ये बंद करून घेतलं आणि तिथून बाहेर येण्यास नकार दिला. क्रू-मेंबर्सने याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर हा इसम चक्क सगळे कपडे काढून उभा राहिला.     

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी १०.३० वाजता विमान लॅंड झालं. विमान लॅंड होण्याआधीच हा इसम विमानाच्या वॉशरुममध्ये जाऊन बसला आणि तिथून बाहेर येण्याचं नावचं घेत नव्हता. विमानातील सर्व कर्मचार्यांनी त्याला बाहेर येण्याच्या विनवण्या केल्यात, सुमारे अर्धा तास विनवण्या करूनही हा इसम बाहेर येत नसल्याने विमानातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना पाचारण केलं.

या इसमाचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्याला उस्मानिया जनरल रुग्णालयात नेलं. दरम्यान, तिथेही या इसमाने नग्नावस्थेत गोंधळ घालायला सुरवात केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. विमान अधिकाऱ्यांच्या मते हा स्वीडिश नागरिक गोव्याहून विमानात बसला होता आणि याला हैद्राबादमार्गे दिल्लीला जायचं होतं. 

दरम्यान, या स्वीडिश नागरिकाने घातलेल्या गोंधळाचा त्रास अन्य प्रवाशांना देखील भोगावा लागला. आता स्वीडिश नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Web Title : marathi news nude swedish citizen creates chaos on Hyderabad airport

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nude swedish citizen creates chaos on Hyderabad airport

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: