'त्यांनी' मुस्लिमांना मारले, दलितांना जाळले.. आता मुलांना मारतायत! : केजरीवाल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नवी दिल्ली : ''पद्मावत' चित्रपटाला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या आंदोलकांनी गुरुग्राममध्ये शाळकरी मुलांच्या बसवर हल्ला केल्यानंतर मी रात्रभर झोपू शकलो नाही', असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. 'मुस्लिमांना मारणाऱ्या आणि दलितांना जाळणाऱ्या शक्तींनीच आता आपल्या लहान मुलांवर हल्ले केले आहेत', असे विधान केजरीवाल यांनी केले. 

गुरुग्राममध्ये शाळेच्या बसवर समाजकंटकांनी हल्ला केला. या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. 'प्रजासत्ताक दिनाच्या काही तास आधीच देशाच्या राजधानीपासून थोड्याच अंतरावर घडलेली ही घटना देशासाठी लाजीरवाणीच आहे', असे केजरीवाल म्हणाले. 

एका भाषणामध्ये केजरीवाल म्हणाले, "मी सर्वांनाच आवाहन करत आहे. आता आपण शांत बसणे परवडणारे नाही. त्यांनी मुस्लिमांना मारले.. दलितांना जिवंत जाळले.. त्यांना मारहाण केली.. आता त्यांनी आपल्या मुलांवर दगडफेक करायला सुरवात केली आहे. आता ते घरात घुसू लागले आहेत. आता तरी गप्प बसू नका..! ही रामाची, कृष्णाची, गौतम बुद्धांची, महावीरांची, गुरु नानकांची, कबीर आणि मीरा, प्रेषित महंमद आणि येशू ख्रिस्ताच्या अनुयायांची भूमी आहे. दगडफेक करणारे लोक मुस्लिम होते, हिंदू होते की ख्रिश्‍चन होते? कुठला धर्म लहान मुलांविरोधात हिंसाचार करायला सांगतो..!'' 

'मी त्या रात्री झोपूच शकलो नाही.. या देशाच्या नागरिकांना शांतता आणि प्रेम हवे आहे.. केंद्रात सत्तेत असलेल्यांना मी एकच विनंती करतो.. कृपया आम्हाला शांततेत जगू द्या', असेही केजरीवाल म्हणाले.

Web Title: marathi news Padmavat Movie Karni Sena protests Gururam Arvind Kejriwal