उद्धटपणामुळे झाला भाजपचा पराभव : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 मार्च 2018

नवी दिल्ली : 'उद्धटपणा आणि कुशासनामुळे भाजपला मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीत दोन जागी पराभव स्वीकारावा गमवाव्या लागल्या', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) ट्‌विटरवरून व्यक्त केली. मध्य प्रदेशमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला विधानसभा पोटनिवडणुकीतील दोन जागा कायम राखण्यात यश आले; पण यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांचे मताधिक्‍य लक्षणीयरित्या कमी झाले आहे. 

या विजयानंतर राहुल गांधी यांनी ट्‌विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली. याचा संदर्भ मध्य प्रदेशमधील यंदाच्या वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. 'आधी राजस्थान आणि आता मध्य प्रदेश.. बदलाची संधी दार ठोठावत आहे, हे दोन्ही ठिकाणी दिसून आले आहे', असे राहुल म्हणाले. गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला दोन जागा जिंकण्यात यश आले होते. राजस्थानमध्येही या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. 

मध्य प्रदेशमधील कोलारस येथे काँग्रेसच्या महेंद्रसिंह यादव यांनी भाजपच्या देवेंद्र जैन यांचा 8,086 मतांनी पराभव केला. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्‍य 24,953 होते. 

मुंगावली येथे काँग्रेसच्या ब्रजेंद्रसिंह यादव यांनी भाजपच्या भाईसाहब यादव यांचा अवघ्या 2,124 मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे मताधिक्‍य 20,765 इतके होते. या दोन्ही मतदारसंघांमधील आमदारांचे निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणुक झाली होती. 

Web Title: marathi news Rahul Gandhi Madhya Pradesh Bypolls