जिओच्या 'प्रजासत्ताक दिन ऑफर' मिळणार अधिक डेटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना घेऊन येत असते. यावेळी जिओ येत्या शुक्रवारपासून नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि ऑफर्स घेऊन येत आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर 'प्रजासत्ताक दिन ऑफर' अंतर्गत हा नवीन प्लॅन जिओ लाँच करत आहे. सध्याच्या प्रीपेड रिचार्ज ऑफर नुसार, जिओ सध्या रोज 1 जीबी डेटा ऑफर करत आहे. पण नवीन ऑफर नुसार, जिओ रोज 1.5 जीबी डेटा ऑफर करणार आहेत. 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून कंपनी 1.5 जीबी डेटा ग्राहकांना पुरवणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिओ डेटात वाढ करुन 2 जीबी डेटाची ऑफर ग्राहकांसाठी घेऊन येईल आणि अशा ऑफर्स सतत ग्राहकांसाठी खुल्याच राहतील. जिओने दिलेल्या 'प्रजासत्ताक दिन ऑफर्स'ची यादी खाली दिलेली आहे. 

जिओ प्रीपेड रिचार्ज प्लॅन 149 रुपये -
42 जीबी, 4G हाय स्पीड डेटा 28 दिवसांसाठी देण्यात येईल. दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास उपलब्ध राहील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल मोफत राहतील. 

जिओ प्रीपेड रिचार्ज प्लॅन 349 रुपये -
105 जीबी, 4G हाय स्पीड डेटा 70 दिवसांसाठी देण्यात येईल. दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास उपलब्ध राहील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल मोफत राहतील. 

जिओ प्रीपेड रिचार्ज प्लॅन 399 रुपये -
126 जीबी, 4G हाय स्पीड डेटा 84 दिवसांसाठी देण्यात येईल. दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास उपलब्ध राहील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल मोफत राहतील. 

जिओ प्रीपेड रिचार्ज प्लॅन 449 रुपये -
136 जीबी, 4G हाय स्पीड डेटा 91 दिवसांसाठी देण्यात येईल. दररोज 1.5 जीबी डेटा वापरण्यास उपलब्ध राहील. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हॉइस कॉल मोफत राहतील. 

Web Title: marathi news reliance jio republic day offer