ट्रकच्या अपघातात पाच जण ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

सीतापूर - ट्रकने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत तीन कुटुंबातील मिळून पाच जण ठार झाले. लेहरपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नेवादा गावात हा अपघात झाला. या गाडीतून चालकासह सात जण प्रवास करीत होते, असे पोलिसांनी सांगितले.

अपघातात ठार झालेले सर्व जण बिस्वा भागातील रहिवासी असून, ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. अपघातातील मृतांची ओळख पटली असून त्यांची नावे अशी : इसरत अली (वय 65), त्यांची पत्नी वसीम फातिमा (वय 60), मुलगी मसीरा (वय 26), बाबूखान (वय 55) आणि निसार खान. अली यांची दुसरी मुलगी सोनी आणि गाडीच्या चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: marathi news sakal news accident news