राष्ट्रपतींच्या ताफ्याने दिली रुग्णवाहिकेला वाट

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्याने आज राष्ट्रीय महामार्गावरून जाताना एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिल्याची घटना येथे घडली.

मुर्शिदाबाद (पश्‍चिम बंगाल) - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्याने आज राष्ट्रीय महामार्गावरून जाताना एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिल्याची घटना येथे घडली.

राष्ट्रपती मुखर्जी यांचे दोन दिवसांच्या पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर आज येथे आगमन झाले. मुखर्जी हे मुर्शिदाबाद येथील हेलिपॅडपासून 25 किलोमीटरवर असलेल्या कानिडीघी येथे एका शाळेचे उद्‌घाटन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली, असे सूत्रांनी सांगितले. या महामार्गावरून राष्ट्रपती मुखर्जी यांचा ताफा जात असताना ताफ्यातील शेवटच्या गाडीला रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आल्यानंतर वेळ न दवडता या ताफ्यातील दुचाकींनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग करून दिला. या रुग्णवाहिकेत कोण होते याची माहिती लगेच समजू शकली नाही.

Web Title: marathi news sakal news president ambulance