पंतप्रधान मोदींच्या देशभरातील महिलांना ट्विटरवरुन शुभेच्छा

गुरुवार, 8 मार्च 2018

नवी दिल्ली - जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील महिलांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांनी विविध क्षेत्रात जे यश मिळवले आहे त्याचा आभिमान असल्याचेही पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

याशिवाय महिलांच्या आयुष्यात बदल घडला तरच 'न्यू इंडिया' निर्माण होऊ शकेल, असे दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे. नव्या भारत निर्माणामध्ये सर्वात पुढे महिला शक्ती असल्याचेही त्यांनी ट्विट केले आहे.

तसेच, एका ट्विटमध्ये मोदींनी स्वच्छ भारत मिशनमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या छत्तीसगडमधील कुंवर बाई यांचा उल्लेख केला. कुंवर बाई यांनी शेळ्या विकून शौचालय बांधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कृतीमुळे खूप प्रभावित झाले होते. त्यांनी कुंवर बाईंचा सत्कारही केला होता.

Web Title: marathi news Women's Day PM narendra modi