अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटरकर नाराज

Marathi News_Amruta Fadnavis_Twitter Post_getting trolled_Christmas event
Marathi News_Amruta Fadnavis_Twitter Post_getting trolled_Christmas event

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत ख्रिसमस निमित्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यावरुन हे टिकास्त्र सोडले जात आहे. 

एका एफएम रेडिओ चॅनलतर्फे ख्रिसमस निमित्त चॅरिटेबल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमाचा प्रचार करण्याच्या हेतूने ट्विट पोस्ट केले. ज्या ट्विटमध्ये, 'बी सांता कॅम्पेन'अंतर्गत गरीब मुलांसाठी ख्रिसमस गिफ्ट दान करा असे आव्हान सौ. फडणवीस यांनी केले आहे. हे ट्विट केल्याच्या काही वेळातच ट्विटरवरुन लोकांनी त्यांच्यावर टिकांचा भडीमार सुरु केला. काहींनी 'तुम्ही लग्नाअगोदर हिंन्दु होता का?' असे तिरकस प्रश्न विचारले. सौ. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीकोनातून केलेले ट्विट योग्य नाही, अशाही प्रतिक्रिया आल्यात. हिंन्दुंच्या सणांमध्येही पुढाकार दर्शविण्याचे सल्लाही लोकांनी दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com