122 वर्षातील 'मार्च 2022' ठरला सर्वात हॉट

मार्च महिन्यात देशाच्या बहुतांश भागात उन्हाचा पारा चाळीशी पार झाला होता.
Temperatures broke all records
Temperatures broke all recordsसकाळ डिजिटल टीम
Updated on
Summary

मार्च महिन्यात देशाच्या बहुतांश भागात उन्हाचा पारा चाळीशी पार झाला होता.

मार्च २०२२ हे भारतातील १२२ वर्षांतील सर्वाधिक तापमान (Temperature) असणारा महिना होता, असे हवामान खात्याने दिलेल्या माहितीतून समोर आले. या मार्चमध्ये तापमानाने सर्व विक्रम मोडले असून, हा मार्च १९०१ पासून १२२ वर्षांतील भारतातील सर्वाधिक उष्ण ठरलाय.

मार्च २०२२ महिन्याला सरासरी ३३.१ तापमान अंश सेल्सिअस होते ज्याने २०१० मध्ये ३३.०९ अंश सेल्सिअस असलेला सर्वकालीन विक्रम मोडला आहे. (Temperatures broke all records, making this March India's hottest in 122 years since 1901.)

Temperatures broke all records
तापमान वाढतेय...दुपारी टाळा कष्टाचे काम

दिल्लीतील (Delhi) काही ठिकाणी कमाल तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला. तर ३ ते ६ एप्रिल दरम्यान निर्जन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मार्च महिन्यात देशाच्या बहुतांश भागात उन्हाचा पारा चाळीशी पार झाला होता, जो सहसा होत नव्हता. मात्र मार्च महिन्याच्या सुमारास हवामान खात्याने लावलेला अंदाज खोटा ठरला. पश्चिमी विक्षोभ अधिक उत्तरकेडे म्हणजे भारतापासून दूर होते आणि राजस्थानमध्ये चक्रीवादळाविरोधी सर्कुलेशन तयार होणार होते. या सगळ्यात मार्च २०२२ हा महिना मागील १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरला.

Temperatures broke all records
रात्री तापमान वाढल्यास पुरुषांच्या जीवाला धोका? काय सांगते संशोधन

मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जास्त गर्मीची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातून गर्मीचे प्रमाण अधिक राहिले. दिल्ली, चंद्रपार, जम्मू, धर्मशाला, पटियाला, डेहराडून, ग्वाल्हेर, कोटा, पुणे (Pune) या भागांत उच्च तापमानाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com