
उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमध्ये एका विवाहित महिलेने प्रेमाच्या नशेत गुंग होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेचे लग्न ६ वर्षांपूर्वी झाले होते. यानंतर तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तो आणि ती अनेकदा भेटत असत. पण नंतर महिलेच्या कुटुंबाला त्या मुलाबद्दल कळले. त्यानंतर महिलेचे कुटुंब कडक होऊ लागले आणि ती महिला तिच्या प्रियकराला भेटू शकली नाही. या नैराश्यामुळे महिलेने आत्महत्या केली.