esakal | महिला युवकाला म्हणाली; घरी कोणीच नाही लगेच ये...
sakal

बोलून बातमी शोधा

married woman was harassed on fen husband was beaten by house at rajasthan

एका युवकाने विवाहीत महिलेला दुपारी फोन केला. महिला म्हणाली, आता घरामध्ये कोणी नसून लगेच ये. युवक तत्काळ महिलेच्या घरी गेला. घरात गेल्यानंतर महिलेच्या पतीने त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

महिला युवकाला म्हणाली; घरी कोणीच नाही लगेच ये...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): एका युवकाने विवाहीत महिलेला दुपारी फोन केला. महिला म्हणाली, आता घरामध्ये कोणी नसून लगेच ये. युवक तत्काळ महिलेच्या घरी गेला. घरात गेल्यानंतर महिलेच्या पतीने त्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

...अन् मिळाला पत्नीचाच 'पॉर्न' व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन ग्रोवर (वय 22) याला परिसरामध्ये राहणाऱया विवाहित महिलेचा मोबाईल क्रमांक मिळाला होता. दररोज दुपारी मोबाईलवर फोन करून महिलेला त्रास देत असे. महिलेने त्याला अनेकदा समजावून सांगितले पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नितीनच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून महिलेने सर्व माहिती नवऱयाला सांगितली. दोघांनी मिळून त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. शिवाय, महिलेच्या नवऱयाने त्याच्या मित्रालाही घरी बोलावले होते. नितीने दुपारी महिलेला फोन केला. महिलेने तत्काळ घरी कोणी नसून, लगेच ये म्हणून सांगितले.

पोलिस म्हणाले थांबा; तरी दोघांचे सुरूच...

नितीन तत्काळ महिलेच्या घराबाहेर आला आणि दरवाजा वाजवला. दरवाजा उडल्यानंतर तो घरात आला. महिलेने दरवाजा बंद केल्यानंतर तिघांनी मिळून त्याची धुलाई केली. ओरडण्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. याबाबतची माहिती पोलिसांना समजली. नितीनला जखमी अवस्थेतच पोलिस घेऊन गेले. याबाबतची चर्चा परिसरात रंगली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...