पत्नीला प्रियकरासोबत पाहिले अन् पती म्हणाला चालू द्या...

वृत्तसंस्था
Monday, 24 February 2020

पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पती म्हणाला तुमचे चालू द्या. शिवाय, पत्नीला पोलिसांसमोर प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिल्याची घटना येथे घडली.

देवरिया (उत्तर प्रदेश): पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पती म्हणाला तुमचे चालू द्या. शिवाय, पत्नीला पोलिसांसमोर प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिल्याची घटना येथे घडली.

तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही...

रामपूर कारखाना क्षेत्रामधील एका व्यक्तीचे दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना दोन लहान मुले आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते शहरात आले. शहरामध्ये आल्यानंतर पत्नीचे एकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. रविवारी (ता. 23) पत्नी प्रियकरासोबत दिसली. पतीने दोघांना पाहिल्यानंतर तुमचे चालू द्या म्हणाला आणि थांबला. काही वेळानंतर त्याने दोघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत गेल्यानंतर काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

...म्हणून जावयाच्या गळ्यात बांधला कुत्र्याचा पट्टा

पोलिस तिघांना घेऊन चौकीत गेले. पोलिसांनी पत्नीला कोणासोबत राहायचे आहे म्हणून विचारल्यानंतर तिने प्रियकराचे नाव घेतले. दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले. यानंतर नवऱयाने पत्नीला प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिली. पत्नी प्रियकरासोबत गेल्यानंतर पती दोन मुलांना घेऊन घरी परतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

मुलगी आईला म्हणाली मी प्रेग्नंट; आता काय करू...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married women goes to lover at uttar pradesh