जगाचा निरोप घेऊ म्हटल्यावर एकटाच पळाला...

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

तीन मुलांची आई आणि गावातील एकाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाची गावात चर्चा सुरू झाल्यानंतर दोघांनी जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीने गोळ्या खाल्ल्यानंतर प्रियकर मात्र पळून गेला. यामध्ये प्रेयसीला जीव गमवावा लागला आहे.

भोजपूर (बिहार): तीन मुलांची आई आणि गावातील एकाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाची गावात चर्चा सुरू झाल्यानंतर दोघांनी जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीने गोळ्या खाल्ल्यानंतर प्रियकर मात्र पळून गेला. यामध्ये प्रेयसीला जीव गमवावा लागला आहे.

प्रियकराची लाथ, पोलिसांचा हात अन् प्रेमाला साथ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपूर जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाहीत महिला आणि युवकामध्ये प्रेमसंबंध होते. महिलेला तीन लहान मुले आहेत. दोघांच्या प्रेमाबद्दल गावामध्ये चर्चा होऊ लागल्यानंतर दोघांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे महिलेने विष घेतल्यानंतर प्रियकर मात्र पळून गेला. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठविल्यानंतर अहवाल हाती आला. यामध्ये विषामुळे मृत्यू झाल्याचे समजले. महिलेच्या नातेवाईकांनी युवकाला आत्महत्येला जबाबदार धरले आहे. युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

पत्नीला प्रियकरासोबत पाहिले अन् पती म्हणाला चालू द्या...

युवकाने तपासादरम्यान सांगितले की, 'आम्ही आत्महत्येचा निर्णय घेतला होता. पण, प्रेयसीने गोळ्या घेतल्यानंतर घाबरून मी घटनास्थळावरून पळ काढला.'

तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married women tried to commit suicide with lover at bihar