वीरांगणेला सलाम! शहिद जवानाची पत्नी तीन वर्षांनंतर बनली सैन्यात अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीरांगणेला सलाम! शहिद जवानाची पत्नी तीन वर्षांनंतर बनली सैन्यात अधिकारी

वीरांगणेला सलाम! शहिद जवानाची पत्नी तीन वर्षांनंतर बनली सैन्यात अधिकारी

चेन्नई: देशाचं संरक्षण करताना सीमेवर धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या ऋणात नेहमीच देश आणि देशवासी राहतात. त्यांच्या शहदत्वानंतर त्यांच्या पत्नी वीरांगणांना देखील हा देशा सलाम करतो. इतकं मोठं दु:ख उराशी बाळगून देखील त्या साहसाने पुढे जातात. काही वीरांगणा आपल्या पतीच्या जाण्यानंतर सैन्यात जाण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि ते ध्येय साध्य देखील करतात. ज्योती नैनवाल अशाच एक वीरांगणा आहेत, ज्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपलं दु:ख मागे टाकून त्याचीच वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: 'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

ज्योती नैनवाल यांनी काल शनिवारी चेन्नईमध्ये आयोजित केलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये 28 महिला कॅडेस्टमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांची मुले देखील सैन्याच्या गणवेशात दिसून आली. 33 वर्षे वयाच्या ज्योती नैनवाल या आपली 9 वर्षाची मुलगी लावण्या आणि 7 वर्षांचा मुलगा रेयांशला खांद्यावर घेतलेल्या दिसून आल्या.

दीपक नैनवाल हे जम्मू काश्मीरमधील अंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना एप्रिल 2018 मध्ये जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं मात्र, ते वाचू शकले नाहीत. मे 2018 मध्ये त्यांचं निधन झालं. मात्र, या घटनेनंतरही ज्योती यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी देशसेवेचा संकल्प उराशी बाळगला.

हेही वाचा: शॉर्ट पँटमुळे तरुणाला स्टेट बँकेत नाकारला प्रवेश, दिलं 'हे' कारण

पतीच्या हौतात्म्यानंतर काही काळानंतरच त्यांनी सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) टेस्टची तयारी सुरु केली. टेस्ट पास झाल्यानंतर त्यांनी चेन्नई अकॅडेमीमध्ये 11 महिने प्रशिक्षण घेतलं. त्या लेफ्टनंट म्हणून सैन्यात सामील झाल्या आहेत.

loading image
go to top