हुतात्मा जवानांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च सरकार करणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

यापूर्वी हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणून दरमहा 10 हजार रुपये देण्याची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा रद्द करण्याचे आदेशच संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशासाठी लढणारे जवान अनेकदा आपल्या प्राणांची आहुती देतात. या जवानांच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे केंद्र सरकारने आज (गुरुवार) स्पष्ट केले.

Indian army

भारतीय लष्करातील जवान देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देत असतात. त्यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून काही आर्थिक मदतही केली जाते. तसेच यापूर्वी हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणून दरमहा 10 हजार रुपये देण्याची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा रद्द करण्याचे आदेशच संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. याबरोबरच लष्करातील हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी विशिष्ट मर्यादा होती. या मदतीवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत लष्करातील आजी-माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. 

त्यामुळे सरकारने हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाचा लाभ हुतात्मा, जखमी आणि बेपत्ता झालेल्या जवानांच्या मुलांना मिळणार आहे.

Web Title: Martyr Jawan Children Education Expenses will taken by Central Government