जेएनयू हल्ल्यात नाव आल्यानंतर कोमल पोहचली महिला आयोगाकडे

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

जेएनयुतील हल्ल्याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेली कोमल शर्मा ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (एबीव्हिपी) संबंधित असल्याचेही सांगण्यात येत आहे. काही माध्यमे आणि दिल्ली पोलिसही माझे नाव घेऊन बदनामी करत असल्याची तक्रार तिने महिला आयोगाकडे केली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्यात दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी कोमल शर्मा हिचे नाव आल्यानंतर तिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात आपले नाव बदनाम करण्यात येत असल्याचेही तिने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयुतील हल्ल्याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. या हल्ल्यात सहभागी असलेली कोमल शर्मा ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (एबीव्हिपी) संबंधित असल्याचेही सांगण्यात येत आहे. काही माध्यमे आणि दिल्ली पोलिसही माझे नाव घेऊन बदनामी करत असल्याची तक्रार तिने महिला आयोगाकडे केली आहे.

'निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा...

जेएनयूमध्ये 5 जानेवारीला तोंड बांधून आलेल्या तरुणांच्या टोळीने हल्ला केला होता. या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे. या हल्ल्यात चेक्सचा शर्ट घालून हल्ला करणाऱ्या मुलीची ओळख पटल्याचा दावा करण्यात येत आहे. ती दिल्ली विद्यापीठाच्या दौलतराम महाविद्यालयातील विद्यार्थिनी असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. 

जेएनयू हल्लाप्रकरणी नोटीस बजावलेल्या कोमल शर्मा या तरुणीनं राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. आपल्या नावाची बदनामी करण्यात आल्याची तक्रार तिने आयोगाकडे केली आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं दिल्ली पोलिसांसह माध्यमांना यात लक्ष देण्यासाठी पत्र पाठवले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masked woman in JNU attack photo not me Komal Sharma tells NCW