कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Massive Fire at Lucknow Coaching Centre : अनेक विद्यार्थी घाबरून आरडाओरड करत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. काही विद्यार्थ्यांनी खिडक्यांमधून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवल्याचे सांगितले जात आहे.
Massive Fire at Lucknow Coaching Centre

Massive Fire at Lucknow Coaching Centre

esakal

Updated on

Massive Fire at Lucknow Coaching Centre: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा आणि दाट धुरामुळे अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com