कोलकतामध्ये हॉटेलला आग; दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

या आगीत अनूप अग्रवाल व जुगलकिशोर गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी अनेक जणांचे जीव वाचविले.

कोलकता - शहरातील हो ची मिनाह सराणी भागातील गोल्डन पार्क हॉटेलला आज (गुरुवार) पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर, सात जण जखमी आहेत.

अग्निशमन दलाच्या गाड्या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी नऊ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. जखमींना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉटेलच्या किचनमधून आगीला सुरवात झाली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. त्यानंतर आग हॉटेलभर पसरली. यामुळे दोन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर, सात जण जखमी झाले आहेत. काही जणांना जीव वाचविण्यासाठी गॅलरीतून उड्या मारल्या.

या आगीत अनूप अग्रवाल व जुगलकिशोर गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी अनेक जणांचे जीव वाचविले.

Web Title: Massive fire at high-end hotel in Kolkata: 2 killed, 7 injured

टॅग्स