दोन महिन्यानंतर दिल्ली पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर देशाची राजधानी दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आता हळूहळू काही नियम शिथिल करण्यात येत असून दिल्लीतील रस्त्यावर गजबज दिसू लागली आहे.

नवी दिल्ली : दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर देशाची राजधानी दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आता हळूहळू काही नियम शिथिल करण्यात येत असून दिल्लीतील रस्त्यावर गजबज दिसू लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दिल्लीच्या रस्त्यांवर पुन्हा वाहतूक कोंडी दिसू लागली आहे. मंगळवारपासून दिल्लीकर घराबाहेर पडू लागल्याने एकाच वेळी खासगी वाहने, बस, रिक्षा यांची गर्दी पाहायला मिळाली. सरकारी कार्यालये तसेच खासगी कंपन्यांमध्येही १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आल्याने दिल्ली परत पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. संध्याकाळी सात ते सकाळी सात लोकांच्या सार्वजनिक वावराला बंदी असल्याने मार्केटमधील रात्रीचा झगमगाट परतायला वेळ लागणार आहे.
--------
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा
--------
विमानप्रवासासाठी मार्गदर्शक सूची जाहीर; सेतू ऐपविषयी महत्वाची घोषणा
--------
नवी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात कनॉट प्लेसमध्ये मात्र शुकशुकाट होता. दुकाने उघडण्यासाठी सम-विषम सूत्र लागू करण्यात आले आहेत. ग्राहकांची संख्या अगदीच कमी असल्यामुळे या सूत्राचा पुनर्विचार केला जाण्याची शक्यता आहे. जुन्या दिल्लीतील नेहमी गजबजलेल्या चाँदनी चौकात बुधवारी काही प्रमाणावर रेलचेल होती. जनपथवरही दुकानदार ग्राहकांची वाट पाहात बसून होते. बस गाड्यांमध्ये फक्त २० प्रवाशांनाच प्रवेश असल्याने प्रत्येक बसथांब्यावर चाकरमान्यांची बसमध्ये घुसण्याची ओढ लागलेली होती. मंगळवारी फक्त साडेतीन हजार बस गाड्याच रस्त्यावर उतरवल्या गेल्या. बुधवारी त्यात भर पडली असली तरी पूर्ण संख्येने बस सेवा सुरू होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. 

दिल्लीत ई-रिक्षा, सायकल-रिक्षा आणि ऑटो रिक्षावाल्यांसमोर पेच निर्माण झाला असून टाळेबंदीच्या नियमामुळे फक्त एक प्रवासी घेऊन जाता येतो. हा नियम रिक्षावाल्यांना आर्थिकदृष्टय़ा न परवडणारा आहे. रहिवासी क्षेत्रांत ये-जा करण्यासाठी ई-रिक्षा सोयीची असते. प्रत्येक प्रवाशामागे दहा रुपये घेतले जातात. त्यामुळे एका फेरीत चाळीस-पन्नास रुपये मिळतात. पण आता फक्त दहा रुपयेच मिळतील. भाडे दुप्पट केले तरी तोटा होणारच, अशी ई-रिक्षावाल्यांची परिस्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massive traffic jams on roads in Delhi amid relaxations